Friday, June 21, 2013

प्रेम कविता


उगवत्या नव्या सूर्याला
मी रोजच पाहत आहे
ज्या वळणावर साथ आपली सुटली
तिथे कधीची मी तुझी वाट पाहत आहे

तू दिलेस वचन मला
येशील तू इथे पुन्हा
मी मात्र आहे इथेच
यात आहे का माझा काही गुन्हा

आपली निसर्गाने देखील
ती वाट सजवली
पहावया आपुले मिलनाचे दृश्य
साऱ्यांची नजर आतुरलेली

सायंकाळच्या मंदावत्या सूर्यप्रकाशात
शोधे सारे वाट परतीचा
मी मात्र एकटाच येथे रेंगाळत
नाही मजला साथ तुझ्याविना कुणाचा

नाही करू शकलो माफ
आजही मी स्वतःला
ब्रम्हात वेड्या पडून
उगाच तुला मी दिले जायायाला

दिलेस वचन तू आपल्या प्रेमाची
येशील तू लवकर परतुनी
मनात फुटती अंकुर सवंशयाची
गेलीस खोटे वचन तू देवूनी...

-राहुल

विरह कविता


तुझ्याशी आज खुप बोलाव वाटत होत,
पण सुचत काही नव्हत..
मनात खुप काही साचलेल होत,
पण तुझ्या कोणत्याच प्रश्नाच उत्तर सापडत नव्हत..
तु पाहिलेल स्वप्न मला आपल वाटत होत,
पण तुझ्या स्वप्नांन मध्ये फक्त माझच स्थान नव्हत..
सगळ्यांन साठी मी होतो,
पण खर तय या जगात माझ कोणीच नव्हत..
मला पण वाटायच आपल कोणीतरी असाव,फक्त माझ्यासाठीच जगणार
माझ्या सोबत हसणार,माझ्या सोबत रडणार..
नात्यांचे बंध जोपासणार,शेवटपर्यंत नाते टिकवणार..
मी नसल्यावर माझी आठवण काढणार..
पण कोणीच नाही अस मी मेल्यानंतर पण माझ्यासाठी रडणार.......!
-राहुल

प्रेम कविता


प्रेम करून बघ
तू प्रेम करून बघ

दिसेल तुला सारे
डोळ्यात आसवांचे किनारे
प्रीतीच्या तालात सुरांचे वारे

साडौल ह्या जीवनात
तू फक्त एकदाच वळून बघ
प्रेम करून बघ
तू प्रेम करून बघ

तुझाच विचार असतो रोज माझ्या मनी
तुलाच तर पाहून म्हणत असतो मी गाणी
तुझं चालणं, तुझं बोलणं असतं माझ्या ध्यानी
तूच तर आहेस ग माझ्या स्वप्नातली राणी

असल्या माझ्या मनाचा
विचार तर करून बघ
प्रेम करून बघ
तू प्रेम करून बघ


-राहुल
पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण ...
आजही घालतात साद मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...
तुझ्या आठवणित गुंफतात मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...

नकळत हात तुझा हातात येता,
उमललेली ह्दयाची कळी ...
वाढलेले ह्दयाचे ठोके,
तुने करिता चावट खोडी ..

पावसात चिंब भिजताना,
तुला पाहन्याचा तो आनंद ...
ढगांच्या गर्जनाने तुझा,
माझ्या मीठीत येण्याचा तो प्रसंग ...

तो थेंब पावसाचा, तुझ्या गालावरती थांबलेला ..
घेताना मीठीत तुला, माझ्या ओठांनी मी टीपलेला ..
सोबतिला असलेला मातिचा ही गंध,
अजूनही आहे श्वासात माझ्या, तुझ्या गजर्‍याचा सुगंध ..

कितीतरी अशा आठवणि, आनी बरेच असे क्षण,
पडत असतो पाऊस बाहेर, आनी आतमध्ये रडते माझे मन ..

असा हा पाऊस वेडा, नेहमिच तुझी आठवण घेऊन येतो,
होताना एकरूप मातीशी, माझ्या पापण्यांना ओल करून जातो ..

पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण .....................

-राहुल

प्रेम


प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऐकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

प्रेम म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे......

-राहुल

शेवटची भेट...


भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला

निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील

त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल

वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?

जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?
प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?

बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल

कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील!

नजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही.......
-राहुल
बोलणारा सहज बोलुन जातो,त्याला कुठ माहीत असत ऐकणरच्या मनावर शब्द ना शब्द कोरला जातो...
जाणारा सहज जगाचा निरोप घेतो,त्याला कुठ माहीत असत त्याच्या मागे कुणीतरी रडत असत...
वेळ न थांबता निघून जाते,तिला कुठ माहीत असत तिच्यामुळे कोणालातरी फार उशीर होतो...
जीव लावणार कुणी भेटल की इतका लळा लागतो,पण त्याला कुठे माहीत असत जीव लावुन कुणीतरी दुर जाणार असतं...........
-राहुल
तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस .....
-राहुल
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना
जशी रात्र चंद्राविना
जसा मानव भावनांविना
सांग तु माझीच ना
कसे जगावे तुझ्याविना
जसे झाड पानांविना
जसे फुल सुगंधाविना
सांग तु माझीच ना
कसे जगावे तुझ्याविना
जसा समुद्र पाण्याविना
जसा दिवस सुर्याविना
सांग तु माझीच ना
कसे जगावे तुझ्याविना
जशी बाग् फुलंविना
जसे आकश चांदण्यांविना
सांग तु माझीच ना
कसे जगावे तुझ्याविना
कसे जगावे तुझ्याविना
-राहुल
बरंच काही निघून गेलयं
तरीही मी उभाच आहे
अर्थ सर्वच संपून गेलाय
तरीही जीवन सुरुच आहे

वेळ केव्हा निघून गेली
मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा
हाती काहीच उरले नाही

आता सर्व शांत झालयं
वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता
श्रावणानंतर होत तसं

तरीही,

बरंच काही शिल्लक आहे
अजून माझ्या हाती
काही शण अजूनही आहेत
फक्त माझ्यासाठी

त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे

एकच गोष्ट फक्त मी
माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी
फक्त तुझ्यासाठी झुरलो

आजही मला एकच फक्त
सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या शणीही
तुझी उणीव भासतेय
तुझी उणीव भासतेय...




विस्कटलेले नाते अमुचे
समजण्याचा ते असे पलीकडचे
आठवणीच्या तीक्ष्ण दाभणाने
टाके देत ती शिवू लागली

आता पुन्हा एकदा दवबिंदु
आठवणीत ती जमवू लागली

आठवणीच्या ठिगळांची चादर अमुची
पांघरली या विश्वासी संसाराची
होतो तोच मी अन तीच ती
स्वप्ने नवे गुंफू लागली

आता पुन्हा एकदा दवबिंदु
आठवणीत ती जमवू लागली

ओठात ओठ रमली अमुची
विसर पडली अवघ्या विश्वाची
मी नव्हतो माझात अन मिठीत ती
हर्षात ती भिजू लागली

आता पुन्हा एकदा दवबिंदु
आठवणीत ती जमवू लागली

प्रेम जुने नवी भेट अमुची
भेट जणू ती नव्या जन्माची
माझा मी नाही अन तिची ती
माझात ती हरवू लागली

आता पुन्हा एकदा दवबिंदु
आठवणीत ती जमवू लागली

कसे सांगू तुला
किती प्रेम करतो मी तुझ्यावर
एक चान्स दे मला
तुझ्यासाठी करेल, जे केले नाही आजवर

आंधळा झालोय तुझ्या प्रेमात मी
कोणी सावरेल का मला
स्वप्नात येते तू दिवस रात्रं
याची चाहूल आहे का तुला

तुझी आठवण येता,
चुकतो माझ्या हृदयाचा ठोका
तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये बघण्याचा
कधी सोडत नाही मोका

असं वाटता कि तुझ्या सुंदर नयनांमध्ये
स्वतःला विसरून जाऊ
काळ्याभोर केसांमध्ये
स्वतःला गुंतवून घेऊ

का, कसे, केव्हा सांगू
मी किती प्रेम करतो तुझ्यावर
भीती वाटते कि,
"काय असेल तिचे उत्तर "

असा विचार येतो माझ्या मनात
असतील का तिला माझ्या बद्दल भावना
आणि विचारातच मी अडकून जातो
कधी पूर्ण होतील का माझ्या मनोकामना !!!!
तु नाते तोडले तरी मी ते तोडले नाही...
दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला
मी अजूनही पाणी देणे सोडले नाही...!!

असे काय केले मी काय घडले माझ्या हातून
की निखळ प्रेम करूनही माझ्या जाण्याने
तुझे काही बिघडले नाही
दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला
मी अजूनही पाणी देणे सोडले नाही...!!

जन्म घेतल्यापासून इतके प्रेम
स्वतावरही केले नाही तरी
निष्पाप निरागस माझे प्रेम
कधीच तुला कसे कळले नाही
दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला
मी अजूनही पाणी देणे सोडले नाही...!!

तुझ्यावर प्रेम करता करता
स्वतःला कधीच गृहीत धरले नाही
तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशीही
प्रेमाचे नाते कधी जोडले नाही
म्हणून तु सोडून गेल्यावर आता
माझे ह्या जगात कुठे...
अस्तिवच उरले नाही...
अस्तिवच उरले नाही...!!
-राहुल
ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज,
शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी,
डोळ्यातून अश्रु
बरसले.....
तिचीच आस धरून,
आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ,
जगनेही मी विसरलो.....
तिचीच वाट पाहत,
पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून
ह्या,
आभाळा सारख्या बरसल्या.....
खुप काही म्हणायच
होता, शब्द माझे
आतुरलेले
मुखातून न उमलता,
डोळ्यातून उमललेले.....
म्हंटल ज़रा जवळ जाऊन,
तिच्याशी थोड
बोलाव
तिच्या आठवणीसंगे
जगतो, तिलाही थोड
कळाव.....
तिच्या आठवणीची ओंजंळ,
तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता,
जिवापाड
मी जपलेली.....
कंठ आज दाटून आला,
तिला समोर पाहून
बरच काही बोलायच
होत, मनात गेले शब्द
राहून.....
इतक्यात तिने पाहिले
मला, डोळ्यात अश्रु
ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर
मिळाली, मलाही न
कळत.....
नव्हती ती आज माझी,
झाली दुसऱ्या कोणाची
रेशम
गाठी तुटल्या आमच्या,
तरी सदैव
राहिली ती या वेड्या मनाची.....
-राहुल
शाळेत एका लहान मुलाने
आपल्या मैत्रीणीला
विचारलं : काय गं हे प्रेम
काय असतं ?
.
.
.
.
.
.
.
.
मैत्रीण : प्रेम म्हणजे?
मला माहितीये की तू
मधल्या सुट्टीत,
रोज माझ्या
बॅगेतल्या कप्प्यातली
चोकलेट चोरून खातोस,
आणि तरीही मी आज ती
त्याचं ठिकाणी ठेवली आहेत..
फक्त तुझ्यासाठीच........

पहिला पाऊस,


पावसानेही बरसावे जोवर
तिचे अश्रू आवरत नाही

नदीही आतूर आहे भेटावयास
सागरास त्या
बरसु दे

वाहत रहावे जोवर भेट होत नाही

फुलाने दरवळावे जोवर
माझी प्रेयसी येत नाही

जागता जागता रात्र सरते
पण ती येत नाही

त्या पारव्याने ही तिला भेटावे
विचारावे तिला
माझे प्रेम का जानत नाही..

पावसानेही बरसावे जोवर

माझी प्रेयसी बोलत नाही

ओठांचा गुलकंद माझ्या ओठांस
जोनर ती देत नाही

बरसत रहावे तोवर जोवर
माझे प्रेम तिला जाणवत नाही..
-राहुल
नभातल चांदण
तुझ्या डोळ्यात दावल
प्रेमसरी होऊन
मला भिजवलं
कस सांगू तुला
हे काय केलंस तू
फक्त इतकंच म्हणेन
मला वेड केलंस तू......
पतंग होऊन मला
नभात उडवलं
इंद्रधनुष्यावर
नेऊन बसवलं
कस सांगू तुला
हे काय केलंस तू
फक्त इतकंच म्हणेन
मला वेड केलंस तू......
स्वप्नात येऊन मला
झुल्यावर झुलवल
आनंदाच्या डोहात
मला डुबवलं
कस सांगू तुला
हे काय केलंस तू
फक्त इतकंच म्हणेन
मला वेड केलंस तू......
तुझ्या प्रेमपाशात
मला अडकवलं
प्रीतीच्या गंधाला
मनात पसरवलं
कस सांगू तुला
हे काय केलंस तू
फक्त इतकंच म्हणेन
मला वेड केलंस तू......
तुझ्यामुळेच माझं मन
मला विसरलं
तुझ्या प्रेमात इतकं
खुळ ते झालं
कस सांगू तुला
हे काय केलंस तू
फक्त इतकंच म्हणेन
मला वेड केलंस तू....
-राहुल
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला

निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील

त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल

वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?

जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?
प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?

बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल

कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील!

नजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही.......
-राहुल
रे खुळ्या या आसवांनो,
बांध का हा पार केला,
ज्या कुणी हा वार केला,
तो कधीचा दूर गेला।
दो घडीची साथ त्याची,
दो घडीच्या सोबत्याची,
रात्रीपुरता टेकलेला,
लावून हुरहुर गेला।
रे सुरांच्या अक्षरांनो,
का उगा झंकारता,
ज्यामुळे हा रंग आला,
तोच वादी सूर गेला।
रे मनाच्या पाखरांनो,
खंतावता का शोधतांना,
लाट अशी झेपावली अन,
मिटवून गेली त्या खुणांना।
-राहुल
तुझं उमलणं, तुझं बहरणं,
तुझ्या डोळ्यांत माझं हरवणं...
हेच माझं विश्व म्हणत,
अवती-भवती तुला धुंडाळणं...
माझ्यापाशी राहिलं काय?
माझं असं होतं काय?
कसं सांगू तुला आता... तू नसताना होतं काय??

उन्हातलं चांदणं, चांदण्यातलं ऊन,
यातला फरक कळतो काय?
बुध्दीची ओरड, मनाची हुरहुर....
अन् विजय मनाचाच होतो काय?
नको विचारूस पुन्हा मला, तू नसताना होतं काय?

नुकतंच दूर गेल्यावरही,
वर्षांचा भास होतो काय?
गोड आठवणी, मृदू भावना,
ओढ यांची लगते काय?
कसं सांगू तुला आता, तू नसताना होतं काय??

आपलं माणूस जवळ असावं,
भावना हट्टी होते काय?
येण्याच्या तुझ्या वाटेकडे,
नकळत डोळे लागतात काय?
नको विचारूस पुन्हा पुन्हा तू नसताना होतं काय??
-राहुल
काळजाचा एक ठोका जो कधी थांबलेला,
आज आठवणींनी तुझ्या पुन्हा चुकलाच आहे,
डोळ्यात कधी आटलेले अश्रू ,
अचानकच गालावरी ओघळीत आहे.....
स्वप्नं कधी विसरलेले ,
आज अचानक पुन्हा पहिले आहे,
रागचे नि प्रेमाचे धागे तुटलेले कधी,
आज अचानक गुंफीत आहे...........
नात्याला नाव न जरी या,
आठवणीचे गाव आहे,
पुन्हा परतीची अशा जरी ना,
मनातं तोची भाव आहे...........
-राहुल
आता होऊच शकत नाही
काल ची रात्र पुन्हा येऊ शकत नाही
गेलेली वेळ पुन्हा येऊशकत नाही
लुकलुकणारे तारे वाट पाहत थांबू शकत नाही
जेवढा विश्वास मी केला तिच्यावर
तो पुन्हा आता करु शकत नाही
वादळाचा सामना केला हि असता तुझ्यासोबत
पण मी वादळात एकटाच उभा राहू शकत नाही
कोरीच राहिली रोजनिशी त्यात शब्दच उतरले नाही
लेखणीच रुसून बसली जी आता कधीच लिहू शकत नाही
प्रेम खूप केले तिच्यावर
आता कुणावर करूच शकत नाही
खूप काही मनात आता ते पुन्हा होऊच शकत नाही ..!!
-राहुल
तो एक क्षण तुझ्या माझ्या भेटितला,
तो एक क्षण तुझ्या माझ्या मैत्रीतला|
तो एक क्षण तुझ्या माझ्या प्रितितला,
तो एक क्षण तुझा माझ्यापासून दूरजाण्याचा|
तो एक क्षण तुझ्या निखळ हस्यत रामन्याचा,
तो एक क्षण तुझ्यासोबत स्वप्ना रंगवण्याचा|
तो एक क्षण रुसन्यातला, रागवण्यातला,
तो एक क्षण आपल्या भांडणातला,
तोच एक क्षण तुझा माझी समजूत घालण्यातला,
आणि तीच एक वेळ तुला माझी आणि मलातुझी ओळख करून देणारा|
असे अनेक क्षण आणि अनेक प्रसंग आठवण होऊन रोज भेटणारे,
आणि मला तुझी ओढ लावणारे||
-राहुल
माझं पहीले प्रेम अधुरं राहीलं.....
प्रितीचे दिसले फ़ुल अचानक,
मन हे उसळुन आले,
शब्द ओठावर येता येता,
फ़ुल दुर निघुन गेले.......!!!!

एक एक क्षणानं,
जीवन पुढे सरकत होत,
आठवणीच्या रुपानं मात्र,
पुन्हा पुन्हा परतत होतं............!!!

एकदाच पहीले तु वळुनी,
अन ह्रुदयात बाण खोल गेला,
एका उमेदीनं तुला साद घातली,
पण सादाला प्रतिसाद नाही मिळाला.......!!!

माझ्या मनातील भावना तुला,
कधी दिसलीच नाही,
न सांगता माझि प्रित,
तुला कधी कळलीच नाही.............!!!

माहीती आहे तु माझी कधीच नाही होणार,
तरी मनात सदैव तुझेच प्रेम राहणार,
तुझ्यात मी नसलो तरी,
माझ्यात फ़क्त तु आणि तुच सापडणार.........!!!!!

तुझ्यापासुन दुर जाताना पाय माझे अडखळले,
तुझ्या विरह दुखा:त गालावर अश्रुही ओघळले,
तुझ्याविना माझ्या आयुष्याला आता काय अर्थ आहे,
जीथे तु नाही तिथे माझं सारं आयुष्यच व्यर्थ आहे........!!!

ईतक प्रेम केलं कि प्रेम हेच जिवन झाले,
प्रेम होन्या अधिच प्रेमभंगाचे खुप चटके लागले,
प्रेमाच्या वाटेवर माझं सर्वस्व हरवलं,
माझं पहीले प्रेम अधुरं राहीलं....

-राहुल
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऐकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

प्रेम म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे......

-राहुल
रात्री जागून विचार करणं प्रेम
नसतं..
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम
असतं..
हातात हात धरुन चालणं प्रेम
नसतं..
ती नसताना तिचं असणं प्रेम
असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम
नसतं..
पाकळीसम तिला जपणं प्रेम
असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम
नसतं..
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम
असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम
नसतं..
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम
असतं...
-राहुल
तसे काहीच नाहीय
तुला miss करण्यासारखे
तसे काहीच नाहीय
तुला आठवण्यासारखं
तरीही का तुलाच खुप आठवतोय
आज तुला खुप miss करतोय...
तु जीवनात आलीस
खुप खास बनून राहिलीस
वाटले होते तु हि असशील
इतरांसारखीच अनोळखी
काय असेल तुझ्यात इतके विसरता येईल
पण तसे झाले नाही
विसरण्याचा खुप प्रयत्न करतोय तरी
आज तुला खुप miss करतोय...
आताच कुठे आपले नाते जुळले
मनाच्या वाटेने येऊन हृदयाला भिडले
मला कळलेच नाही इतक्या खोलवर रुतले
असे का ह्याचाच विचार करतोय
आज तुला खुप miss करतोय...
मला आठवते आपली पहिली भेट
निव्वळ योगायोगच तर होता
त्यापुढे काही असावे हा
प्रश्नच अस्तित्वात नव्हता
स्वप्नांतही वाटले नव्हते
इतके तुझ्यात रमतोय
आज तुला खुप miss करतोय...
तु नक्की आहेस कोण हे उमगत नाही
तुझे अंतरंग काही केल्या उलगडत नाही
असे वाटते हरवुन जाईन तुझ्यात
खरेतर हळूहळू तुझ्यातच हरवतोय
आज तुला खुप miss करतोय...
ह्या जन्मात आपली भेट क्षणाचीच आहे
कदाचित आपले भेटणे नियातीत नाही
आज नाही पण पुढचे सर्व जन्म
देवाकडे तुलाच मागतोय
आज तुला खुप miss करतोय...
आज तुला खुप miss करतोय...
-राहुल
जेंव्हा आठवेल तुला तो दिवस ..
गुलाबाचे फुल देऊन मी केलेला प्रोपोस ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील ना ? ..

जेंव्हा आठवतील तुला ती सोबत घालवलेली संध्याकाळ ..
समुद्राच्या किनार्यावर मिठीत घालवलेला तो काळ ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..

जेंव्हा आठवेल तुला सोबत घालवलेला प्रत्येक क्षण..
प्रेमात तुझ्या होणारे वेडे माझे मन ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील ना ?

जेंव्हा कोणीच नसेल तुझी साथ देणारा..
मनापासून तुझ्यावर प्रेम करणारा ..
तेंव्हातरी आठवण काढशील ना ..
तेंव्हातरी प्रिये रडशील ना ?
-राहुल
भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...

प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते.... विसरन्याची...

खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना... ♥♥♥

-राहुल
कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ?

हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी....,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...???

लाख झाला असेल मनाचा दगड....,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??

जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...??

या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य..
पण..... तरीही जीव जडतातच ना .....?? ♥♥♥

-राहुल
तू समजुन का घेत नाही..........
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !

तू दुर असलीस की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !

कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!

न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!

तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!

किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही !!
श्बादांच्या बंधनात अडकलेलं नातं
आज मोकळ्या हवेत खुलत होतं
वार्याच्या प्रवाहात दूरवर दरवळत होत
नकळत एक अनामिक वाट चालत होतं

डोळ्यातला ओलावा आज कोरडा होता
जग जिंकल्या पेक्षा जास्त आनंद होता
चंचल तिच्या डोळ्यात एकटक पाहत होतो
पहाटेच स्वप्न भर दुपारी सजवत होतो

पुढचा प्रत्येक क्षण मी जपत होतो
आठवणीच्या पुस्तकात उमटवत होतो
तिच्या अस्तित्वाची जाणीव रेखाटत होतो
तिच्यासवे पुस्तकाला अगदी जीवाशी जपत होतो

गाली खळी पडून तीही गोड हसली होती
जणू काट्यानसवे गुलाबाची कळी रुतली होती
माझ्या स्वप्नांना ती हि रंगवत होती
नकळत अनाकिम नात्याला नाव देत होती...
-राहुल